ऑनलाईन सराव प्रश्नसंच ८

ऑनलाईन सराव प्रश्नसंच सोडवा आणि लगेच निकाल पाहा

जि. प. प्राथ. शाळा नांदूर सुकळी ता. नेवासा जि. अहमदनगर

उतारा वाचा आणि त्याखाली दिलेल्या प्रश्न क्रमांक १ ते ३ यांची उत्तरे द्या.

औरंगाबाद शहरापासून जवळच असलेला देवगिरी किल्ला हे मराठवाड्यातील एक प्रेक्षणीय स्थळ. या किल्ल्याला दॉलताबादचा किल्ला असेही म्हणतात. या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे तो एका चक्रव्यूहासारखा आहे. म्हणूनच हा किल्ला पाहताना पर्यटकांना मार्गदर्शनाची गरज भासते. बालेकिल्ल्यापर्यंत जाण्यासाठी भुयारासारखे रस्ते व असंख्य पायर्या आहेत. किल्ल्याची तटबंदी शिळा कापून बनवलेली असल्याने त्याला फार घसरण आहे. या किल्ल्यात चिनी महालाच्या डावीकडे एका बुरुजावर एक प्रचंड तोफ आहे. या तोफेचा मागील बाजूच्या टोकाचा आकार मेंढ्याच्या तोंडासारखा आहे, म्हणून या तोफेचे नाव मेंढातोफ आहे. अशा या किल्ल्यात सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, खिलजी, तुघलक, बहमनी, निजामशाही, मोगल राज्यकर्त्यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले. दौलताबादच्या जवळच वेरुळच्या जगप्रसिद्ध लेण्या आणि घृष्णेश्वराचे मंदिर आहे. यामुळे याठिकाणी एक छोटीशी सहल होऊ शकते.



1. दौलताबाद किल्ल्याचे वैशिष्ट्य कोणते नाही ?
हा किल्ला चक्रव्यूहासारखा आहे
या किल्ल्याची तटबंदी शिळा कापून बनवलेली आहे
या किल्ल्यातील बालेकिल्ल्यापर्यंत जाण्यासाठी भुयारासारखे रस्ते आहेत
हा किल्ला पाण्यात आहे

2. देवगिरी किल्ल्याच्याजवळ कोणत्या लेण्या आहेत ?

घारापुरी
कार्ले
वेरुळ
पित्तळखोरा

3. 'जमिनीखालील गुप्त मार्ग' या शब्दसमूहाबद्दल कोणता शब्द उतार्यात आला आहे ?

भुयार
चक्रव्यूह
तटबंदी
रस्ता

4. 'त्या पिशवीत शंभर मोहरा होत्या' या वाक्यातील सर्वनाम ओळखा ?

शंभर
त्या
मोहरा
होत्या

5. 'साने गुरुजी ...... सांगत' या वाक्यातील गाळलेल्या जागी शुद्ध शब्द निवडा.

गोष्टि
गोष्टी
गोश्टी
गोश्टि

6. पुढीलपैकी कोणता जोडशब्द नाही ?

हलकाफुलका
कळतनकळत
गोडधोड
हिरवेपान

7. वचन लक्षात घेता गटातील वेगळा शब्द ओळखा ?

हात
पाय
कान
डोळे

8. शेजारी या शब्दाकरता असलेल्या इंग्रजी शब्दाचे योग्य स्पेलिंग निवडा.

niebar
neighbour
neibour
neghbour

9. इतर शब्दाशी यमक न जुळणारा शब्द निवडा.

pick
tick
pink
kick

10. कॅपिटल व लहान अक्षरांची बरोबर असलेली जोडी निवडा

V-u
N-n
M-w
D-b

11. वाघाला शेळी म्हटले, शेळीला हत्ती म्हटले्, हत्तीला कासव म्हटले तर सर्वात मोठा प्राणी कोणता ?

कासव
शेळी
वाघ
हत्ती

12. सागर सरीतापेक्षा हुशार आहे, सरीता सुरेशपेक्षा हुशार आहे व सुरेश सुजातापेक्षा हुशार आहे, तर सर्वात हुशार कोण ?

सरीता
सागर
सुरेश
सुरज

13. सरळ रांगेत उभा असलेल्या सिद्धेशचा समोरुन ५ वा क्रमांक असून त्याच्या लगत पाठीमागे उभा असलेल्या तेजसच्या पाठीमागे १७ मुले उभी आहेत तर रांगेत एकूण किती मुले आहेत ?

२०
२१
२२
२३

14. 'जवाहरलाल नेहरु स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते' या वाक्यातील सर्वात जास्त अक्षरे असलेल्या शब्दाचे मधले अक्षर लिहा.

ला


कोणतेही नाही

15. गार्गीला तीन बहिणी व दोन भाऊ आहेत. तिच्या एका भावाचे नाव अनुज आहे. अनुजला किती बहिणी आहेत ?






16. शिवजन्मापूर्वी विजापूरवर कोणाची सत्ता होती ?

कुतुबशाहाची
आदिलशाहाची
मुघल बादशाहाची
निजामशाहाची

17. शिवरायांनी १६४५ साली स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा कोणत्या मंदिरात घेतली ?

रायरेश्वराच्या
भवानीमातेच्या
शंकराच्या
गणपतीच्या

18. अफजलखानाच्या भेटीच्यावेळी शिवरायांचा कोणता वकील बरोबर होता ?

कृष्णाजी भास्कर
काझी हैदर
पंताजी गोपीनाथ
जिवा महाला

19. शिवरायांच्या राज्याभिषेकाचे पौरोहित्य कोणी केले ?

मोरोपंत पिंगळे
गागाभट्ट
मोरेश्वर पंडितराव
निराजी रावजी

20. शिवाजी महाराजांनी 'राज्यव्यवहार कोश' कोणत्या भाषेत तयार करून घेतला ?

संस्कृत
फारसी
हिंदी
मराठी



ऑनलाईन सराव प्रश्नाविषयी काही शंका अथवा अडचणी असल्यास येथे लिहा..?