ऑनलाईन सराव प्रश्नसंच १२

ऑनलाईन सराव प्रश्नसंच सोडवा आणि लगेच निकाल पाहा

जि. प. प्राथ. शाळा नांदूर सुकळी ता. नेवासा जि. अहमदनगर

1. 'त्रास सहन केल्याशिवाय मोठेपण मिळत नाही' या अर्थाची म्हण ओळखा.

गाढवाला गुळाची चव काय
प्रयत्नांती परमेश्वर
पालथ्या घड्यावर पाणी
टाकीचे घाव सोसल्याशिवाय मोठेपण मिळत नाही

2. 'प्रवासी लोक मोरांना पाहण्यासाठी जयपूरला जातात' या वाक्यातील उद्देश्य विभाग ओळखा.

मोरांना
जयपूरला जातात
प्रवासी लोक
प्रवासी लोक मोरांना

3. खालीलपैकी पुल्लिंगी असलेला शब्द कोणता ?

समुद्र
होडी
लाट
नदी

4. खालीलपैकी भूतकाळी क्र‍ियापद कोणते ?

पाहीन
पाहिला
पाहणार आहे
पाहतो

5. '........ सुंदर फूल आहे' या वाक्यात गाळलेल्या जागी शुद्ध शब्द निवडा.

गूलाब
गुलाब
गुलाभ
गुलब

6. वेगळ्या उच्चाराने सुरु होणारा शब्द निवडा.

bag
pad
bat
bad

7. तुमच्या शिक्षणाची काळजी कोण घेते ?

neighbours
elder brother
uncle
parents

8. मालवाहतूक करणार्या वाहनाचे नाव सांगा.

car
truck
jeep
tanker

9. द्राक्षांना खालीलपैकी इंग्रजी शब्द कोणता ?

Bannana
Apple
Grapes
Chickoo

10. गाईच्या पिल्लाला काय म्हणतात ?

cub
calf
lamb
kid

11. पिवळ्याला हिरवा म्हटले, हिरव्याला लाल म्हटले, लालला पांढरा म्हटले, पांढर्याला काळा म्हटले, काळ्याला निळा म्हटले तर गवताचा रंग कोणता ?

लाल
हिरवा
पांढरा
काळा

12. पाच प्राण्यांच्या धावण्याच्या शर्यतीत हत्तीच्या मागे वाघ पळत होता, सशाच्या पुढे घोडा पळत होता, हत्ती आणि ससा यांच्यामध्ये उंट पळत होता तर सर्वात शेवटी कोण पळत होते ?

हत्ती
वाघ
उंट
घोडा

13. संगिताचे वय आईच्या वयाच्या निमपट आहे. जर संगिताचे वय ३१ वर्षे असेल तर आईचे वय किती ?

९३
४३
६१
६२

14. एका घड्याळात ६ ठोके होण्यास अर्धा मिनिट वेळ लागतो, तर त्याच घड्याळात १५ ठोके होण्यास किती सेकंद लागतील ?

७५
९०
१५०
१०५

15. ४२ मुलांच्या रांगेत समोरुन ८ व्या मुलाचा मागून कितवा क्रमांक येईल ?

३४ वा
३५ वा
३६ वा
३७ वा

16. अफजलखानाच्या वधानंतर शिवरायांनी विजापूरकरांच्या ताब्यातील ..... किल्ला जिंकला.

विशाळगड
पन्हाळगड
पुरंदर
रोहिडा

17. बडा सय्यदला कोणी ठार केले ?

जिवा महालाने
संभाजी कावजीने
येसाजी कंकने
पंताजी गोपीनाथने

18. आदिलशाहाने 'चंद्रराव' हा किताब कोणाला दिला ?

शहाजीराजांना
खंडोजी आणि बाजी घोरपडेला
जावळीच्या मोर्यांना
फलटणच्या निंबाळकरला

19. मावळात राहणार्या लोकांना ..... म्हणत.

माळकरी
मावळे
सैनिक
मराठे

20. आदिलशाहाने शहाजीराजांना ..... हा किताब दिला.

सरनोबत
सरनाईक
वजीरे आजम
सरलष्कर



ऑनलाईन सराव प्रश्नाविषयी काही शंका अथवा अडचणी असल्यास येथे लिहा..?