जीवा महाला हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा अत्यंत विश्वासू, शूर अंगरक्षक होता. अफजलखानाने प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांना भेटीचे निमंत्रण देवून दगाफटका करण्याचा प्रयत्न केला. त्याचा कट वेळीच ओळखून शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला. यावेळी शिवाजी महाराजांवर चालून आलेल्या सय्यद बंडाला रोखून वीर जीवा महाला यांनी वीरता दाखविली. त्यामुळे होता जीवा म्हणून वाचला शिवा असे आजही म्हटले जाते.
स्वतःच्या जीवावर उदार होत त्यांनी शिवाजी महाराजांचा जीव वाचवला होता, महाराजांवर चाल करून गेलेल्या सय्यद बंडाला त्यांनी यमसदनाला पाठवले आणि इतिहासात त्यांचा पराक्रम 'होता जीवा म्हणून वाचला शिवा' या म्हणीने नोंदवला गेला. जीवा महालांची दखल भारतीय टपाल खात्यानेही घेतली व 'वीर जिवाजी महाला - शिवाजी महाराजांचे अंगरक्षक' या नावाने पोस्टाचे विशेष पाकिट प्रकाशित केले आहे.
अधिक वाचनासाठी संदर्भदुवे
पैलवान जिवाजी महालेप्रतापगडाच्या पायथ्याशी उभारणार वीर जीवा महाले यांचे स्मारक
जीवा महाला यांच्या सन्मानार्थ पोस्टाचे पाकीट