ऑनलाईन सराव प्रश्नसंच २७

ऑनलाईन सराव प्रश्नसंच सोडवा आणि लगेच निकाल पाहा

जि. प. प्राथ. शाळा नांदूर सुकळी ता. नेवासा जि. अहमदनगर

1. 'घेतली आकाशात भरारी फुलांची पक्ष्यांनी' या शब्दांचा योग्य क्रम लावला असता एक अर्थपूर्ण वाक्य तयार होते व एक अनावश्यक शब्द शिल्लक राहतो तो शब्द पर्यायातून निवडा ?

फुलांची
पक्ष्यांनी
आकाशात
भरारी

2. सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आपण कोणता दिन म्हणून साजरा करतो ?

शिक्षणदिन
शिक्षकदिन
बालिकादिन
बालदिन

प्रश्न ३ ते ५ रिकाम्या जागी योग्य शब्द भरुन सुसंगत वाक्याचा परिच्छेद पूर्ण करा.

3. अंघोळीनंतर मुले ..... उभी राहिली.

पाय जोडून
डोके ठेवून
कान देऊन
हात जोडून

4. अगरबत्तीचा मंद ..... हवेत दरवळला होता.

वास
दुर्गंध
धूर
सुवास

5. मुलांनी देवाला ..... केला.

टाटा
नमस्कार
आशिर्वाद
उपवास

6. एक संख्या ९ वेळा घेऊन तिची बेरीज केली तेव्हा बेरीज ७६५ आली, तर ती संख्या कोणती ?

८२
८०
६५
८५

7. क ही एक सम संख्या असून तिचे विषम संख्येत रुपांतर करण्यासाठी तिच्यात खालीलपैकी कोणती संख्या मिळवावी लागेल ?

२१०
६१८
१०००
३१५

8. ९७०१, ३५३७, ६५७६, ४५०२, २३०१ या संख्या उतरत्या क्रमाने मांडल्यास चौथ्या संख्येतील दशकस्थानचा अंक कोणता असेल ?






9. २०८ या संख्येचा पाव भाग म्हणजे किती ?

५१
७५
५२
५०

10. पावणे दोन हजार ही संख्या विस्तारीत रुपात कशी लिहाल ?

१००० + २०० + ५० + ०
१००० + ७०० + ५० + ०
१००० + ५०० + ०० + ०
२००० + ७०० + ५० + ०

11. संत ज्ञानेश्वरांनी तरूण वयात कोणत्या गावी समाधी घेतली ?

आळंदी
देहू
आपेगाव
पैठण

12. शिवरायांनी आयुष्यभर कोणता बाणा जोपासला ?

सत्तेचा
पितृभक्तीचा
मातृभक्तीचा
'सज्जनांना राखावे, दुर्जनांना ठेचावे' या उक्तीचा

13. शिवरायांनी ..... ठार मारण्यासाठी तलवार उपसल्याने, तो खिडकीवाटे पळू लागला.

दिलेरखानाला
फाजलखानाला
सिद्दी जौहरला
शायिस्ताखानाला

14. शिवरायांनी राज्याभिषेकापासून कोणता शक सुरु केला ?

राज्याभिषेक शक
विक्रम संवत
स्वराज्य शक
शालिवाहन शक

15. लोकांना शक्तीची उपासना करण्याची शिकवण देण्यासाठी रामदास स्वामींनी ठिकठिकाणी कोणाची मंदिरे उभारली ?

शंकराची
गणेशाची
दुर्गामातेची
हनुमानाची

16. पाण्यात साखर टाकून पाणी ढवळले की साखर दिसेनाशी होते, कारण .....

पाणी शुद्ध असते
पाणी पारदर्शक असते
पाण्याला रंग नसतो
साखर पाण्यात विरघळते

17. टॉवेल खरबरीत आहे हे आपल्याला कोणत्या ज्ञानेंद्रियामुळे समजून येते ?

त्वचा
डोळे
कान
जीभ

18. वनस्पतीस पाणी कोणत्या अवयवामुळे पुरविले जाते ?

फांदी
फूल
मूळ
पान

19. खालीलपैकी सेवा पुरवणारा घटक़ कोणता नाही ?

शिक्षक
शेती
बॅंक
डॉक्टर

20. महाराष्ट्र दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला साजरा केला जातो ?

१५ ऑगस्ट
२६ जानेवारी
५ मे
१ मे