ऑनलाईन सराव प्रश्नसंच ३४

ऑनलाईन सराव प्रश्नसंच सोडवा आणि लगेच निकाल पाहा

जि. प. प्राथ. शाळा नांदूर सुकळी ता. नेवासा जि. अहमदनगर

1. खालीलपैकी बरोबर असलेली जोडी शोधा.

मांजर - म्यॅंव म्यॅंव
हत्ती - फुत्कार
साप - चित्कार
वाघ - भुंकणे

2. 'पात्र' या शब्दाचे दोन भिन्न अर्थ असलेला योग्य पर्याय ओळखा.

पत्र, योग्य
नदीचा विस्तार, काठ
भांडे, भूमिका
पत्रा, पात्र

3. 'सोयरा' या शब्दाला जोडून येणारा शब्द कोणता ?

बाई
मायना
बहिरा
धायरा

4. 'मूर्खाला चांगल्या गोष्टीची किंमत न करता येणे' या अर्थाची म्हण निवडा.

तळे राखील तो पाणी चाखील
असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी
काखेत कळसा, गावाला वळसा
गाढवाला गुळाची चव काय ?

5. लिंगानुसार गटात न बसणारा शब्द कोणता ?

फळा
शाळा
गळा
मळा

6. गटात बसणारा पर्याय निवडा - दैनिक, साप्ताहिक, वार्षिक, ......

कार्तिक
आठवडा
वर्ष
पाक्षिक

7. तुम्हाला शाळेत येण्यास उशीर झाला आहे आणि वाटेत एक आजोबा पाय घसरुन पडले आहेत तर तुम्ही काय कराल ?

रस्त्यावरील लोकांना मदत करण्यास सांगू
त्यांना घरी जाण्यास सांगू
त्यांच्याकडे पाहत हसत राहू
त्यांना उठवून योग्य ती मदत करुन नंतर शाळेत जाऊ

8. गटाशी जुळणारे पद ओळखा - डोळे, जीभ, कान, ?

ओठ
मान
नाक
पाठ

9. उत्तरेकडे तोंड करुन उभा असणारा चिन्मय डावीकडे काटकोनात वळला तर त्याच्या समोरील दिशा कोणती असेल ?

आग्नेय
पूर्व
पश्चिम
दक्षिण

10. एका संत्र्याच्या बागेत एका झाडाच्या रांगेत मधल्या झाडाचा क्रमांक दोन्हीकडून २४ वा आहे तर त्या रांगेत एकूण किती झाडे आहेत ?

४८
४७
५०
४९

11. शिवरायांच्या ..... लढाया करण्याच्या पद्धतीला 'गनिमी कावा' म्हणतात.

समोरासमोर
समुद्रावर
मैदानावर
लपूनछपून

12. घोडखिंड ..... नावानेच इतिहासात अमर झाली.

बाजी खिंड
स्वराज्य खिंड
स्वामीनिष्ठ खिंड
पावनखिंड

13. सर्वसामान्य लोकांची व्यवहाराची व बोलण्याची भाषा ..... होती म्हणून संत ज्ञानेश्वरांनी त्याच भाषेतून ज्ञानेश्वरी लिहिली.

संस्कृत
अर्धमागधी
पाली
मराठी

14. 'जावळीचे मोरे' हे कोणाचे जहागिरदार होते ?

आदिलशाहीचे
निजामशाहीचे
शहाजीराजांचे
विजयनगरचे

15. कोणत्या सालापासून शिवाजी महाराज 'शककर्ते राजे' झाले ?

सन १६७५
सन १६६५
सन १६७०
सन १६७४

16. कोणते लोक देशाचे सामर्थ्य वाढवू शकतात ?

रोगी
आजारी
कंजूष
निरोगी

17. आपल्या समाजात प्रत्येक गोष्ट कशी करायची याची दिशा कशामुळे मिळते ?

नियमांमुळे
नागरिकांमुळे
नेत्यांमुळे
संस्थांमुळे

18. 'पोटदुखी' हा आजार कोणत्या कारणामुळे होतो ?

केस न विंचरल्याने
रात्री लवकर झोपल्याने
नखात घाण साचून राहिल्याने
दररोज अंघोळ केल्याने

19. खालील पर्यायातून योग्य विधानाचा पर्याय ओळखा.

तांदूळ शिजवण्यापूर्वी धुवू नयेत
जास्त तेलकट व तिखट पदार्थ खाऊ नयेत
आहारात हिरव्या पालेभाज्या खाऊ नयेत
गाजर, मुळा यासारखे पदार्थ कच्चे खाऊ नयेत

20. कारखान्यातील सांडपाणी हे कोणत्या प्रकारचे प्रदूषण आहे ?

वायू प्रदूषण
ध्वनी प्रदूषण
जल प्रदूषण
माती प्रदूषण