1. ४, २, ३ व १ हे अंक एकदाच वापरुन लहानात लहान चार अंकी संख्या तयार केल्यास त्या संख्येच्या दशकस्थानी कोणता अंक येईल ? ३ ४ १ २
2. घड्याळाच्या दोन काट्यांमध्ये दुपारी ३ वाजता कोणता कोन होतो ? लघुकोन विशालकोन काटकोन सरळकोन
3. गणेशोत्सवासाठी प्रत्येकी ११ रुपये याप्रमाणे ७ जणांनी, प्रत्येकी २५ रुपये याप्रमाणे ७ जणांनी व प्रत्येकी ५१ रुपये याप्रमाणे ७ जणांनी देणगी दिली, तर एकूण किती रुपये देणगी जमा झाली ? ७०९ ७९० ६९० ६०९
4. ५५० सेमी लांबीची तार १० ठिकाणी समान अंतरावर तोडल्यास प्रत्येक तुकड्याची लांबी किती ? ५ सेमी ५० सेमी ११० मिमी ५५ सेमी
5. दोन अंकी सम संख्या किती आहेत ? ९० ४५ ४७ ४४
6. एका रांगेत ७ मुले होती. त्याच रांगेत मुलांच्या दुप्पट मुली येऊन उभ्या राहिल्या. जर रांगेत मध्यभागी कोमल उभी असेल तर, तिचा क्रमांक कितवा ? १० १३ १२ ११
7. एका सांकेतिक भाषेत 'ईश्वरदास' हा शब्द '४८३७१' व 'बोधकथा' हा शब्द '२६५९' असा लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत 'कसदार' हा शब्द कसा लिहाल ? ५३७१ ५७३१ ५१३७ ५१७३
8. 'चैत्र' महिन्याला 'फाल्गुन' म्हटले, 'फाल्गुन' महिन्याला 'वैशाख' म्हटले, 'वैखाखाला' 'माघ' म्हटले व 'माघ' महिन्याला 'ज्येष्ठ' म्हटले तर 'होळी' हा सण कोणत्या महिन्यात येईल ? चैत्र फाल्गुन वैशाख माघ
9. तुमच्या शाळेच्या बागेत झाडावरुन पडलेले पक्ष्याचे पिल्लू तुम्हाला दिसले, तर तुम्ही काय कराल ? घरी उशीर होईल म्हणून निघून जाऊ सर्व मित्रांना एकत्र करुन पिल्लाला खेळवत बसू पक्ष्याचे पिल्लू अलगद उचलून बागेतील माळीमामांकडे देऊ पिल्लू अलगद कचराकुंडीत नेऊन टाकू
10. सुखरुप या शब्दापासून 'विक्री' या अर्थाचा कोणता दोन अक्षरी शब्द तयार होईल ? सुख खप सुप रुप
11. ........ ला तीन बाजू असतात. Square Circle Cylinder Triangle
12. Let us ........ a game. (योग्य क्रियापद घाला) played playing is playing play
13. योग्य क्रम असलेला पर्याय निवडा. March, May, April June, March, July March, June, May March, April, May
14. my, shy, fly, cry, try, dry, day. या शब्दातील यमक न जुळणारा शब्द निवडा. my try fly day
15. आपल्या शरीरातील अन्न पचवणारा अवयव कोणता ? heart mouth tongue stomach
16. चुकीची जोडी सांगा. कानांना गोड वाटणारा - कर्णमधुर कार्यात तत्पर असणारा - कार्यतत्पर जाणून घेण्याची इच्छा असणारा - जिज्ञासू अस्वलाचा खेळ करुन दाखविणारा - मदारी
17. जसे गाईचे - वासरू तसे घोडीचे - ? शिंगरू पाडस करडू पिल्लू
18. 'पहिला' या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता ? नंतरचा पलीकडचा शेवटचा दुसरा
19. 'पिण्यास योग्य असणारा द्रव्यपदार्थ' या शब्दसमूहासाठी योग्य पर्याय निवडा. दूध पेय पाणी कॉफी
20. 'सावध' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहिताना शब्दाच्या आधी ........ हे अक्षर लिहावे लागेल. बिन न बे कु