इयत्ता ३ री
विषय - भाषा
सराव प्रश्नसंच
निर्मिती व संकल्पना : - संतोष दहिवळ ☎ 9822012435 www.santoshdahiwal.in
सुस्वागतम
1. रशीदने डबा या शब्दासाठी कोणता शब्द वापरला ? पिशवी दप्तर करडा सांकव
2. म्हशीला काय चावता येत नव्हते ? गवत वैरण कडबा गंजी
3. झाडावरून कोण हाक मारत आहे ? म्हैस रेडकू बैल खारुताई
4. पाणी कमी आहे असे कोणाचे म्हणणे होते ? म्हशीचे रेडकूचे खारुताईचे बैलकाकाचे
5. मनुलीने कसली पाने पुस्तकात ठेवली ? जास्वंदीची पिंपळाची बेलाची वहीची
6. बाईंनी कोणती कविता वर्गात शिकवली ? मनुलीची पानाची चित्राची नदीची
7. बाईंनी कशाचे चित्र काढून आणायला सांगितले ? मोराचे मुलीचे डोंगराचे नदीचे
8. नदी पार करायला कोण घाबरत होते ? बैलकाका खारुताई रेडकू गाढवदादा
9. सकाळीच नदी पार करून कोण गेले होते ? बैलकाका खारुताई गाढवदादा यापैकी नाही
10. नदी या शब्दाला खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता ? वनिता सरिता सावित्री गंगा
11. रेडकापेक्षा उंच कोण होते ? खारुताई चिमणी कबुतर बैलकाका
12. बुटकी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ? मोठी खोल उथळ उंच
13. नदीजवळ गवत कोण खात होते ? खारुताई गाढवदादा रेडकू बैलकाका
14. एखाद्या डोंगरात नदीचा........होतो. उगम संगम अंत शेवट
15. सरळ" या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ? तिरपे गोल सपाट वाकडे
16. चित्र या शब्दाचे अनेकवचन कोणते ? चित्र चित्रा चैत्र चित्रे
17. कठीण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ? सोपे बळकट दणकट मजबूत
18. रेडकाच्या पाठीवर काय बांधले होते ? थैली गवताचा भारा कडब्याची पेंढी ऊसाची मोळी
19. कडब्याची पेंढी तशी लाकडाची ..... ? गंजी मोळी थप्पी जुडी
20. लाकडाची मोळी तशी मेथीची ..... ? भाजी गठ्ठा मोळी जुडी